शनिवार, २३ फेब्रुवारी, २०१९

......माझी counseling (समालोचन) देखील असफल ठरले... !!!


!! श्री स्वामी समर्थ !!
सदर कुंडली एका स्त्री जातकाची आहे. विवाहास साधारण तीन वर्षे झाली आहेत. मी ज्योतिष जरी असलो तरी देखील counseling चे कार्य देखील मला करावे लागते कारण त्या जातकाची दशा पुढील काही काळापुर्तीच नकारात्मक सुरु असते त्यासाठी हा समजविण्याचा आमचा हट्टहास असतो, परंतू कुंडलीतील ग्रह आपले परिणाम देण्यास सज्ज झालेले असतात अशीच हि कुंडली आहे. विवाह मोडण्याची आणि घटस्पोट घेण्याचा  निर्णय या मुलीने घेतला आहे. परंतू या मुलीच्या कुंडलीत गुरु ३ स्थानी (सुप्तमन) आणि तो ७ भावाला (पती/life partner स्थान) बघत आहे आणि गुरु ९ भावाला देखील बघत आहे (३-९ स्थाने म्हणजे करार-समजाविणे यामध्ये यश येते) त्यामुळे counseling आणि समजविण्याचा प्रयत्न निश्चितच करणे आवश्यक असते. गुरु जर बलवान अथवा सप्तमावर दृष्टीयुक्त असेल कुंडलीत तर सहसा विवाह मोडत नाही, शेवटी शनी महाराज (न्याय/कर्माची फळे देणारा ग्रह) जो परिणाम द्यायचा आहे तो देणारच कारण ते कार्यच त्यांचाकडे आहे आणि शेवटी माझी counseling मात्र फेल झाली आणि या मुलीने आणि मुलाने देखील divorce घेण्याचे अखेर ठरविले आहे. हे couple माझ्याकडे जानेवारीत आले होते. पाहूया कुंडलीत ग्रह आणि शनी महाराज कसे परिणाम देत आहे.


नियम: जर ७ भावाचा सब (उपनक्षत्रस्वामी) जर २ (सुख/पैसा), ७ (life partner/पती/पत्नी) आणि ११ (लाभ/पक्की मैत्री) या भावांचा कार्येश असून दशास्वामी देखील या भावांचे कार्येश असेल तर विवाह आणि वैवाहिक सुख मिळते.


सदर स्त्री जातकाच्या कुंडलीत ७ भाव (वैवाहिक सुख) सब हा शनी आहे. शनी ४ स्टेप बलवान कार्येश पद्धतीनुसार २-७-११ या भावाचा कार्येश नाही तो केवळ ५ स्थानचा कार्येश आहे. तर शनी हा शुक्राच्या नक्षत्रात आणि शुक्राच्या सब मध्ये आहे आणि शुक्र ६ स्थान (वैवाहिक सुखाचे विरोधी स्थान) मध्ये आहे आणि त्यातच आगीत तेल ओतण्याचे काम प्लुटोने केले केवळ ३ डिग्रीच्या ७ भावारंभावार आहे. त्यामुळे वैवाहिक सुखास कमतरता निर्माण झाली.

आता पाहूया दशास्वामी या मुलीला केतूची दशा १५/९/२०१८ समाप्त झाली आणि शुक्राची महादशेला सुरुवात झाली याच महिन्यापासून दोघांचे भांडणे वाढली आहे आणि हि दशा पुढील २० वर्षे आहे आणि शुक्र-शुक्र-शुक्र १५/९/२०१८ ते ६/०४/२०१९ पर्यंत आहे. शुक्र हा ६ स्थानी (७ स्थानाचे व्यय) आहे तो मंगळच्या नक्षत्रात आहे मंगळ हा लग्नेश १ (२-सुख स्थानचा व्यय) असून तो ५ स्थानी आहे आणि शुक्र हा बुधाच्या सब मध्ये आणि बुध देखील ६ स्थानी आहे त्यावर शनी दृष्टी आहे त्यामुळे तो ८ (अडचणी) देखील कार्येश झाला. ४ स्टेप पद्धतीने तो ७-११ चा कार्येश आहे परंतू येथे शनी गोचर पहा कसा परिणाम करत आहे. अष्टक वर्गानुसार शनीचे भ्रमण भाग्य स्थानातून (सासू-सासरे) होत आहे आणि या भावाला केवळ १ बिंदू (कमित कमी २ च्या वर गुण असावे) आहे आणि ७ भावाला २० बिंदू (२४ च्या वर बिंदू असावे) आहे. सध्या जानेवारी २०१९ रोजी शनी १९ अंशावर आहे तर नेपचून हा फसवा ग्रह देखील याच भावात १६ अंशावर आणि हर्षल शनी १३ अंशावर आहे येथेच शनीचे भ्रमण नकारात्मक ठरले सासू-सासरे पासून विभक्त राहणे हि या मुलीची पहिली अट आहे आणि मुलगी हि डिसेंबर २०१८ पासून माहेरी आहे आणि त्यांनी मला आजच कळवल त्यांचा निर्णय, मुलाच एकत्र कुंटुंब आहे आणि वैभाशाली आहे. पण शेवटी ग्रहांनी परिणाम केला हे मात्र निश्चित...!! हे जोडप एकत्र येईल असे मला वाटते कारण २३ जाने २०२० ला शनी जेव्हा मकर राशीत प्रवेश करेल.आणि मुलीची साडेसाती देखील संपते....यांनी एकत्र यावा हीच स्वामी चरणी प्रार्थना ..!! शुभम भवतु !!

मंगळवार, ५ फेब्रुवारी, २०१९

कोणत्या राशींची जोडी बनते Best Couple



 तूळ आणि सिंह - लोकांशी संवाद साधणे, हसतमुख राहणे यांना आवडते. या दोनही राशींचा स्वभाव जवळपास सारखाच असतो, त्यामुळे त्यांचे चांगले जुळू शकते.
 मेष आणि कुंभ - हे आपल्या जोडीदाराला स्पेस देणे पसंत करतात. तसेच एकमेकांच्या सहमतीने उत्तम निर्णय घेऊ शकतात. या दोन राशींच्या व्यक्ती एकत्र आल्याल उत्तम जोडीदार बनू शकतात.
 मेष आणि कर्क - मेष राशीच्या व्यक्ती हुशार असतात. तसेच निडर असतात. यांची जोडी चांगली जमू शकते.
 मेष आणि मीन - मेष आणि मीन राशीच्या व्यक्ती एकत्र आल्यास त्यांच्यात प्रेमळ संबंध तयार होतात. मेष राशींच्या व्यक्ती चांगले नेतृत्व करु शकतात. त्यामुळे एक चांगली दिशा मिळू शकते.
 वृषभ आणि कर्क - वृषभ राशीच्या व्यक्ती नेहमी मदतीसाठी तत्पर असतात. दोघेही कुटुंबाचे महत्त्व जाणतात. शिवाय दोघेही एकमेकांचा आदर करणारे असतात. त्यामुळे ते उत्तम जोडीदार बनू शकतात.
 वृषभ आणि मकर - वृषभ राशींच्या व्यक्ती नेहमी चांगल्या कामाचे कौतुक करणाऱ्या असतात. त्यामुळेच त्यांचे मकर राशींच्या व्यक्तीशी चांगले पटते. हे दोघेही एकमेकांसोबत प्रेम आणि समजुतदारीने राहू शकतात.
 मेष आणि धनू - धनु राशीच्या व्यक्ती नेहमी स्वत:च्या मनाचं ऐकतात. या मस्ती, मजाक करणे यांना आवडते. तसेच मेष राशींच्या व्यक्ती चांगले नेतृत्व करु शकतात त्यामुळे हास्य आणि नेतृत्व असे उत्तम मिश्रण दिसून येते.
 कर्क आणि मीन - या दोन्ही राशींच्या व्यक्ती फार भावूक असतात. तसेच एकमेकांना दुख होणार नाही याची ते काळजी घेतात. समोरच्याला सांभाळून घेणे हीच मोठी गोष्ट जमत असल्याने यांचे चांगले जमू शकते.
 सिंह आणि धनू - सिंह राशीच्या व्यक्ती स्वभावाने जिद्दी असतात पण धनू राशीच्या लोकांना यांचा आत्मविश्वास फार आवडतो. धनु राशीच्या लोकांना मस्ती, मजाक करणे आवडते.
 कन्या आणि मकर - कन्या राशीच्या व्यक्ती फार काळजी करणाऱ्या असतात. त्यामुळे मकर राशीचे लोक यांच्याकडे फारच सहजरित्या आकर्षित होऊन जातात.
 सिंह आणि मिथुन - सिंह राशीच्या व्यक्ती स्वभावाने जिद्दी असतात आणि मिथुन राशीच्या व्यक्तीसोबत हे एकमेकांचे चांगले जोडीदार होऊ शकतात.
 वृश्चिक आणि वृषभ - वृश्चिक आणि वृषभ राशीचे लोक बर्याच बाबतीत एक सारखे असतात. वृश्चिक राशीच्या व्यक्ती लोकांचे सर्वात उत्तम जोडीदार म्हणून वृषभ राशीचे लोकच असतात.
 वृश्चिक आणि कर्क - या दोनही राशींच्या व्यक्ती एकमेकांशी सहयोगाने वागतात. या व्यक्ती संवेदनशील असतात. तसेच एकमेकांना समजून घेण्याचा प्रयत्न करतात.
 वृश्चिक आणि मीन - मीन राशीच्या व्यक्ती फार सहयोगी स्वभावाच्या असतात आणि त्यांची ही गोष्ट वृश्चिक राशीच्या लोकांना पसंत येते.
 कुंभ आणि मिथुन - या दोन्ही राशींचे विशेष म्हणजे या राशीचे लोक जीवनातील प्रत्येक चढ उतारात एकमेकांना साथ देतात.
 मिथुन आणि तूळ - या दोन्ही राशींच्या व्यक्ती एकमेकांवर प्रेमळरित्या अधिकार गाजवतात आणि हीच गोष्ट दोघांमधील प्रेम वाढवण्यास मदत करते. त्यामुळे यांचे चांगले जमू शकते.
(संग्रहित - दिपक पिंपळे -९८२३४४८४४९ )
No photo description available.