गुरुवार, ६ डिसेंबर, २०१२

अनुभव पुन्हा पुनर्वसू नक्षत्राचा

|| श्री स्वामी समर्थ ||
नमस्कार,

काल सायंकाळी एका केस पेपर बघण्यासाठी फाईल मधील कुंडल्या शोधात होतो, ती केस पुन्हा एकदा  रीओपन करायची होती. जातक आमच्याकडे साधारण एक वर्षानंतर आले, मध्ये ईतरत्र भटकले पण आमच्याकडे मात्र आले नाही. पत्रिकेची जन्मवेळ शुद्धी करून आम्ही त्यास वर्षभर जमिनीबाबत व्यवहार होणार नाही सांगितले आणि घडले ही तसेच असो.... 

त्या आमच्या कुंडलीच्या केस पेपर फाईलच्या राड्यात एक पेपर आपली मान बाहेर काढत होता. बघितल्यावर लक्षात आले की तो कागद म्हणजे आम्ही औरंगाबाद मध्ये के. पी. च्या कार्यशाळेत मांडलेली हरवलेल्या व्यक्ती बद्धलची ती केस होती. पुनर्वसू नक्षत्राची प्रचीती आलेली ही कुंडली, मागील लेख याबद्दलच बऱ्याच वाचकांनी प्रतीक्रिया कळविल्या, शास्त्राचा अनुभव हा येतोच केवळ आपला त्यावर विश्वास पाहिजे.

घटना ही मे महिन्यातील आहे.  साधारण मध्यरात्री उलटून गेली व जातकाने आमच्या घरची डॉरबेल वाजविली. जातकाची मुलगी सकाळी टूशनला चालले म्हणून गेली तर घरी परतली नव्हती, मुलीचे १२ वीचे वर्षे, त्यातच बाईजात व जातक हि बडी आसामी,  साहजिकच पालकाचा संयमाचा बांध सुटला होता आणि काय करावे.?... काहीही सुचत नव्हते. त्यांच्या ओळखी पैकी आमच्या वडीलाकडे त्यांना भेटण्यास सांगितले.  गुरुवारी स्वामी मठात भजनाचा कार्यक्रम नुकताच रात्री संपला होता व वडिलांना झोप लागली होती. त्यामुळे त्यांनी जातकास आपण सकाळी यावे असे सांगितले तेवढ्यात आमची स्वारी ही माडीवरून खाली आली, जातक आई-वडील दोघेही चिंतीत दिसत होते, डोळे पाणावलेले होते, मला बघताच वडिलांनी आम्हाला त्यांचा प्रश्न बघण्यास संगीतला, मग काय...! आम्हाला तो बघावाच लागणार होता व ही केस आता आमच्याकडे ट्रान्स्फर झाली. मला देखिल थोडे जीवार येत होते, जाताकास बसण्यास सांगितले व अर्धे डोळे पुसत कम्पूटर सुरु केले.

आम्ही ज्योतिषाचा पसारा उघडला,  नित्याप्रमाणे L S R D, नक्षत्राची नोंद घेत असतो, पुनर्वसू नक्षत्र हे रात्री ८:४० मी. सुरु झाले होते. व ते नंतर सायंकाळ पर्यंत होते, उत्तर तयार होते, आम्ही जातकास मुलगी घरी हे संध्याकाळ पर्यंत येईल असे सांगणार तोच मनात एवढ्या लवकर उत्तर आले तर जातकाला वाटेल की आम्ही झोपेतच प्रश्न बघितला. त्यामुळे व्यवस्थित रित्या कागदावर नोंद करून हा प्रश्न रुलींग प्लानेटने सोडविला. आम्ही कुंडलीमध्ये डोकावले तर बरेच काही लक्षात आले. हरवलेल्या व्यक्तीच्या कुंडलीत चंद्र हा मार्गदर्शक असतो.

कुंडलीकडे बघितल्यास लक्षात येते, पंचमेश हा चंद्र आहे. जातकाचा प्रश्न हा मुली बद्धल, चंद्र हा चतुर्थ स्थानी म्हणजेच पंचमाचे व्ययस्थान (आई-वडील मुलीबद्दल चिंता). येथे कुंडली आई-वडील दोन्ही बरोबर होत त्यामुळे कुंडली फिरविण्याचा म्हणजे पंचमस्थान लग्नी मांडण्याचा द्रविडीप्राणायाम टाळला होता. पुनर्वसू व मुळ नक्षत्रावर हरविलेल्या वस्तू अथवा व्यक्ती सापडते अथवा घरी परतते. असा अनुभव येतो.
प्रश्न दि.२५/५/२०१२ वेळ ०२:१८ १९  स्थळ: औरंगाबाद 
L: (मीन) - गुरु  LS: शनी   S: (पुनर्वसू) गुरु  R: (मिथून) बुध  D: (गुरुवार) गुरु  
येथ आम्ही प्रथम लाभ स्थानाचा सब बघितला तो आहे गुरु व गुरु हा लग्नेश आहे त्यामुळे जातकाची मुलगी घरी परतण्याची ईच्छा पूर्ण होणार, चंद्र हा केंद्रातच आहे याचा अर्थ मुलगी घराच्या जवळच आसपास. घटना हि दिवसभराची आहे त्यामुळे लग्न ज्यावेळ LSRD च्या ग्रहांमधून भ्रमण करेल त्यावेळी घटना घडेल. यासाठी अशी येणारी स्थितीचा आम्ही पर्याय दुसरा निवडला कारण लग्न द्विस्वभावी असून लाभेश शनी असून तो चंद्रावर दृष्टी ठेउन आहे.

कालनिर्णय: ज्यावेळी वृश्चिक लग्न १४ अंश ५३' वर येइल तेव्हा घटना घडेल.  अशी स्थिती हि सायंकाळी ७:१५ असेल त्यामुळे मुलगी हि साधारण ७ ते ७:३० या दरम्यान येईल असे सांगितले यावेळी मंगळ (लग्न), शनी (लग्न न. स्वा.), गुरु (सब) असा पर्याय निवडला. मंगळ LSRD मधे नाही असे ज्योतिषांना वाटल्यास त्यांनी कुंडलीचे निरीक्षण केल्यास उत्तर मिळेल. परंतु जातकाची मुलगी ही ७:४५ घरी आले असे जातकाने कळविले.

येथे शनीने आपले कार्य केले. अर्ध्या तासाने उत्तर चुकले की लागलेच डोक्याच खोबर करायच नसत, जातकाची मुलगी घरी सुखरूप परत आली त्याला महत्व आहे. जातकाने दुसऱ्या दिवशी स्वामी मठात पेढे आणले.  असा हा पुनर्वसू नक्षत्राच महिमा आहे.

आपला,


  
  


1 टिप्पणी: