बुधवार, ९ जानेवारी, २०१३

जन्मवेळ निश्चिती (किमया शासक ग्रहांची)

|| श्री स्वामी समर्थ ||

नमस्कार,

ज्योतिष शास्त्रामध्ये जन्मवेळ निश्चित करण्याच्या वेगवेगळया पद्धती आहेत, परंतु कृष्णमूर्तीपद्धती मध्ये रुलिंग प्लानेटसच्या  (शासकग्रह) आधारे लग्नशुद्धी तसेच जन्मवेळ ही निश्चित करणारी पद्धती अतिशय सहज व उत्तम आहे त्यामुळेच हजबे गुरुजींनी यास 'यक्षियणीची कांडी' म्हटले आहे. याच शासक ग्रहाचा वापर करून कोणत्याची प्रश्नांचे निश्चित कालखंड सांगता येतो यासाठी हवे असते तर तारतम्य व सामान्यज्ञान.

काल जातकाच्या पत्नीने जातकाचे डीटेलस् या ब्लॉगच्या माध्यमातून आमच्या पर्यंत पोहचविल्या व पुन्हा फोन करून जातकाच्या जन्मवेळ  ह्या दोन वेगवेगळ्या आहेत, एक वेळ ही ११:४५ रात्री तर दुसरी ही १२:४५ त्यामुळे  नेमकी वेळ कुठली आहे यामध्ये नेहमी कन्फुजन असते असे त्या म्हणाल्या.  मी त्यांना आज सायंकाळी  भेटण्याची वेळ दिली.

आमच्या पोटापाण्यासाठी चालणारा संघानाकावरचा व्यवहार हा आज दुपारीच संपला होता व आज भेट देणाऱ्या जातकापैकी या जाताकाच्या जन्मवेळ दोन लिहिलेल्या बघीतल्यावर जन्मवेळ निश्चित करण्यासाठी आम्ही काम्पुटरमधील ज्योतिषचा पसारा उघडला व रुलींग प्लानेटसची नोंद घेतली ती पुढील प्रमाणे.

दिनांक: ०९/०१/२०१३ - वेळ दुपारी १२:३७:४१, औरंगाबाद

L:  (लग्न स्वामी) - मंगळ
LS: (लग्न नक्षत्रस्वामी) - केतू
S: (नक्षत्रस्वामी) - बुध
R: (राशीस्वामी) - मंगल
D: (वारस्वामी ) - बुध

जेंव्हा रुलिंगमध्ये चार पेक्षा कमी ग्रह असतात त्यावेळी लग्न स्थावर दृष्टी ठेवणारे तसेच लाग्नेशाच्या युती-दृष्टीतील ग्रहांचा देखील रुलींगच्या ग्रहामध्ये उपयोग करावा लागतो.

याठिकाणी राहू व शनी ची दृष्टी हि लग्न भावावर असून गुरुची दृष्टी ही लग्नेश मंगळावर आहे. त्यामुळे राहू, शनी व मंगळ हे देखील अप्रत्यक्षपणे रुलिंगमध्ये आहे. याचा उपयोग करून जन्मवेळ निश्चित करावी लागेल.  जातकाचे माहिती पुढीलप्रमाणे आहे.

जातक: पुरुष
जन्म दिनांक: २६/०३/१९६४  किंवा २७/०३/१९६४  (वेळ बदल झाल्याने तारीख बदलली)
वेळ : रात्री २३:४५ मी.               /     ००:४५ मी.
जन्मस्थळ: चंद्रपूर

वरील दोन्ही वेळेच्या कुंडली मांडल्या:
वेळ : २३:४५                                                             वेळ : ००:४५
लग्न : वृश्चिक  २६'१२''४५                                          लग्न : धनु  ९'५२''५९  
लग्नभाव: वृश्चिक: मंगळ-बुध-गुरु                              लग्नभाव: धनु :- गुरु-केतू-शनी

वरील निरीक्षण केल्यास लक्षात येती  की -  मंगळ हा रुलिंगमध्ये प्रथम दर्जेचा ग्रह आहे तसेच बुध हा देखील ग्रह वृश्चिक लग्नामध्ये आहे व लग्न भावाचा सब गुरु हा देखील रुलिंगमध्ये अप्रत्यक्षपणे आहे त्यामुळे जातकाची वेळ ही २३:४५ आहे हे निश्चित होते.

जातकाच्या पत्नीने सायंकाळी जातकाची जुनी पत्रिका सापडली आहे व त्यात २३:४५ ही वेळ नमूद केली आहे असे सांगितले तत्त्पुर्वी आह्मी या वेळेची पत्रिका दुपारीच तयार केली आहे व आम्ही त्यास ते दाखविले. जिवनातील सर्व घटना ह्या वेळेशी जुळवून येतात हे देखील सिद्ध केले. त्यांनी आमच्या या आत्माविश्वासाचे कौतुक केले.

या  कौतुकाचे पात्र आम्ही नसून गुरुवर्य कृष्मूमूर्ती व ही पद्धती आहे यात शंकाच नाही. 

आपला,
Preview

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा