शनिवार, ९ फेब्रुवारी, २०१३

आशिर्वाद आणि श्राप नक्की आहे तरी काय ??

सुख आणि दुख ????

एखाद्या मंदिरामध्ये जाणे ... देवाच्या मूर्तीसमोर नतमस्तक होवून जाणे, त्याला खाद्यपदार्थांचे चढावे देणे आणि इच्छा मागणे आणि इच्छा पुरती झाली तर त्याला देवाचा प्रसाद मानणे म्हणजे देवाची भक्ती नाही .

प्रसाद या शब्दाचा अर्थ .....''प्रत्यक्ष साक्षात दर्शन '' असा आहे.

हे तेच दर्शन आहे जे स्वामी विवेकानंद यांना झाले होते , हे तेच दर्शन आहे जे भक्त अर्जुनाला झाले होते , हे तेच दर्शन आहे जे संत तुकाराम महाराज ,ज्ञानेश्वर माउली,नामदेव महाराज, मीराबाई ,जनाबाई ,मुक्ताबाई आणि देखील अशा भरपूर संताना झाले होते 

आशीर्वाद हा आपल्याला मागून भेटत नाही तर तो स्वताच्या कर्मावर अवलंबून असतो .

भगवान कृष्ण भगवतगीता या मध्ये सहजपणे बोलले आहेत कि ...''आजची हीच माणसे एका बाजूने बोलून दाखवितात कि त्यांना सर्व देणारा मीच आहे म्हणजे परमात्मा आहे ,पण काही कालांतरानंतर ,हीच माणसे मीच यांना दिलेले मलाच परत का देतात ''??
माझे मलाच परत देतात . असे का ???
म्हणून देवाकडे काही मागयचेच असेल तर 'जीवन जगण्याची कला मागितली पाहिजे'

जीवन किती जगलो हे महत्वाचे नाही तर जीवन आपण कसे जगलो आणि आता कसे जगत आहे हे महत्वपूर्ण आहे. 
आजचा माणूस हा practical जीवन जगत आहे .तो निर्णय सहजच घेत नाही .सर्व गोष्टी तपासून मगच अंतिम निर्णय घेतो . मग हा देवाच्या भक्तीमध्ये असा घाईगडबडी मध्ये निर्णय का घेतो. देवाने आपले शब्द ,वचन ,नियम हे प्रत्येक ग्रंथामध्ये लिहून ठेवलेले असतानादेखील आजचा माणूस त्याच्याकडे दुर्लक्ष का करत आहे.

काही व्यक्तींना सांगितले जाते कि देवाने भगवतगीता लिहिली आहे ,ज्ञानेश्वरी आहे 
मग समोरून लगेच उत्तर येते कि ,'' अरे वेळ कोणाला आहे हे वाचायला''
सुखी माणूस या गोष्टीचा कधीच विचार करू शकत नाही , म्हणून स्वताच्या मुळापासून भटकल्यामुळे या देवाला त्याच्या जीवनात काही दुख द्यावे लागते ..
पण जसे बोलतात कि 

''आजच्या माणसाच्या तोंडात सुख आले कि तो लगेच गिळून टाकतो ,पण जर दुख आले तर मात्र तो चघळत बसतो ,कारण त्याला दुख पचवण्याची कला हि माहितच नसते ''

मग त्याला शेवटी देवाचे द्वार दिसते ,आणि ज्या गोष्टीकडे लक्ष देण्यासाठी वेळ नसतो,मात्र दुख जाण्यासाठी त्याला देवाकडेच शरण जावे लागते 

जसे बोलतात कि 'तलवारीपेक्षा धार हि शब्दांना असते ' म्हणून शब्द बोलताना सांभाळून बोलावेत .
कारण तुमच्या तोंडातून निघणारा एक चांगला शब्द समोरच्या माणसाचे पूर्ण जीवन सुधारू शकतो . त्या व्यक्तीच्या शरीरामध्ये जो जीव वास करत असतो ,तो फक्त तुमच्यामुळे आनंदित होतो .
आणि जर त्या जीवाला आनंद भेटला तर तोच जीव आपल्याला भरपूर असे आशीर्वाद देत असतो . तुम्ही समोर असू द्या किवा नको ,पण जर तुमच्या चांगल्या कोणत्याही कर्माची आठवण हि समोरच्या माणसाला झाली असेल तर तुम्हाला आशीर्वाद हा अनंत प्रमाणात भेटत असतो.

साई बाबा यांचे वचन आहे कि ,'' अगर मुझसे प्यार करना चाहते हो ,तो मेरे हर एक बंदे से प्यार करो''
''अगर मुझे मानते हो ,तो मेरे हर एक बंदे को भी मानो''
''अगर मेरी सेवा करना चाहते हो,तो मेरे हर एक बंदे कि सेवा करो ''

या जगातले सर्वात मोठे पुण्य म्हणजे दुसर्याला मदतीचा हात देणे ...ज्याला स्वताच्या बाहेर पडता आले ,तोच मदतीचा हात देउ शकतो .
समोरच्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर तुमच्यामुळे हास्य येणे हे एकत्वाचे लक्षण आहे.
मदत हि कोणत्याही स्वरूपामध्ये असू शकते , एका हाताने केलेली मदत हि दुसर्या हाताला समजली नाही पाहिजे .

संतानी सांगितले आहे कि ,''माणसाचे हात हे दुसर्यावर उगारण्यासाठी नसतात तर स्वताचे आणि दुसर्यांचे जीवन उभारण्यासाठी असतात ''

दुख हे याच्या उलट असते.
''दुख जीवन कि झोली में अपने आप गिरता हे ,लेकिन सुख अर्जित करना पडता हे ,वो कमाना पडता हे ''
तुमच्या कोणत्याही शब्दाने किवा वागणुकीमुळे समोरच्या माणसाचे मन हे दुखावले गेले ,किवा जीव हा दुखावला गेला तर दुख येणे हे स्वाभाविकच आहे .

म्हणूनच संत नेहमीच सांगतात कि ,''कर्मावर जोर दे मानवा ,कर्म आहे थोर ''

काळाप्रमाणे माणसाचे विचार देखील बदलत आहेत, त्याचा स्वभाव ,समाजाप्रती त्याची वागणूक सर्व काही बदलत आहे. आपल्या स्वताच्या मुळापासून भटकत आहे . विसरला आहे कि आपण जीवन का जगत आहे . जरुरी आहे विज्ञान बरोबर आध्यात्मिक संस्कृती पुढे आणण्याची :)

रावण आणि राम हे आणि कुठे राहत नाही . ते आपल्यातच असतात . आपल्या मनाला चांगली दिशा भेटली तर ती अवस्था रामाची आहे , नाही तर रावणाची आहे . 
देवाने या युगाला कलयुग हे नाव बरोबर दिले आहे , पण नाव ठेवल्याने युग खराब होत नाही . या युगाला दिशा दिली आहे आजच्या समाजाने आणि त्यात वावरणाऱ्या माणसाने . जर माणूस चांगला वागला , तर हे कलयुगच सतयुग आहे नाही तर उलटे आहे .. म्हणून आपले मन हेच राम आणि कधी कधी रावणाचे अनुकरण करत असते .

शेवटी संत कबीरजी बोलतात कि ,

''जीवनात जेव्हा तुम्ही आला होतात तेव्हा तुम्ही रडत होतात, आणि बाकी सर्व मंडळी हसत होते , कारण तो तुमचा जन्माचा क्षण होता ,
पण मरताना असे काही तरी करा , कि या जगातून निघताना तुम्ही हसणार आणि हे सर्व जग तुमच्यासाठी रडणार '' 

(सौजन्य:  भरत तळाशिलकर) 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा