सोमवार, १३ मे, २०१९

“हरवलेली व्यक्ती परत घेईल का (सापडेल का)?....!!!”


श्री स्वामी समर्थ

मागील रविवारी दि. ०५ मे रोजी सकाळी ७ वाजता फोनची रिंग वाजली, माझी स्वामी मठात पूजेची तयारी सुरु होती, खूप अर्जंट आहे व्यक्ती घरातून ३ मे पासून घरातून निघून गेली आहे आणि आपण प्रश्न कुंडली मांडावी आणि त्या व्यक्तीच्या पत्नीने एक होरारी नंबर पाठविला आहे तो देखील मी पाठविला आहे असे तो म्हणाला त्यास मी पूजा आरती झाल्यावर ऑफस मध्ये गेलो कि प्रथम आपली कुंडली मांडून कळवतो असे सांगितले. हा फोन मुंबई येथून होता.

ऑफिस मध्ये आल्यावर कॉम्पुटर सुरु केले आणि प्रथम कुंडली मांडली, हरवलेल्या व्यक्तीच्या पत्नीने ५० हा नंबर दिला, त्यानुसार कुंडली मांडली आणि ७ स्थान (पतीचे स्थान) फिरवून कुंडली (लग्न भाव) तयार केली आणि तीच कुंडली पुढील प्रमाणे आहे.

प्रश्न कुंडली: ५ मे २०१९, रविवार, वेळ: १०:४२:१३, स्थळ: औरंगाबाद, होरारी न. ५०
रूलीग प्लानेट: रवी, मंगळ शुक्र, गुरु, राहू, केतू

नियम:  हरवलेल्या व्यक्तीच्या लग्न भावापासून २-४-११ या भावापैकीचा कार्येश ग्रहाच्या दशा-अंतरदशेत व्यक्ती परत येते.

वरील नियमा व्यतिरिक्त जातकाच्या आयुष्याला काही धोका आहे का, तर अशावेळी लग्न भावाचा सब मारक/बाधक भावाचा कार्येश आहे किंवा नाही हे पाहून तो व्यक्ती जीवित अथवा मृत आहे आहे याचा देखील आढावा घ्यावा लागतो, मंगळ संबध असेल तर पोलिसांची मदत घ्यावी लागते हे सर्व काही पाहावे लागते आणि कुंडलीचा आधार घेऊन अंतिम निष्कर्श येवून उत्तर सोमोरील व्यक्तीस सांगावे लागते. हे नियम पाहूया या कुंडलीत.



कुंडलीत ७ भाव लग्नी मांडला आहे कारण पत्नीने प्रश्न विचारला आहे. या कुंडलीत १ भाव (जातक) आणि ८ भावाचा (धोका, संकट) सब (उपनक्षत्र स्वामी) हा बुध आहे आणि आत बुधाचे बलवान कार्येश ग्रह पाहूया.

० बुध:
केतू: १ (गुरु १२) (यु.शनी १, २, ३) (मंगळ दृ ६)
० रवी:
शुक्र:  ४ ११

एकूण: १-२-३-६-१२ आणि ४-११

बुध हा १ (हरवलेला जातक), १२ (लांब दूर, इस्पितळात, मंदिर), २ (मारक स्थान) ३ (८ चे ८ स्थान) मंगल ६ (पोलिसांचा आधार घेणे) आणि शुक्र मुळे ४ आणि ११ भावाचा कार्येश झाला त्यामुळे जातक हे सापडेल हे निश्चित झाले.

तसेच बुध हा सप्तमेश (बाधक) असून त्यात राहू देखील आहे याचाच अर्थ बुध हा १-२-७-६-१२ या भावाचा कार्येश असल्यामुळे जातकाच्या जीवाला धोका आहे आणि मंगळाचा संबध असल्याने पोलिसाचा आधार घ्यावा लागतो, दुय्यम कार्येश सब रवी हा ९-५ चा कार्येश असल्याने एक आशेचा किरण म्हणजे जातक जीवत आहे असे दर्शविते, आम्हाला अशा महत्वाच्या गोष्टीत एकदम अंतिम निर्णय घेता येत आणि जरी कुंडली पूर्णत: जीवाला धोका दर्शवित असली तरी ५-९ मुळे जातक कदाचित सुरक्षित आहे असे मी समोरील प्रश्न विचारलेल्या व्यक्तीस कळविले आणि दशा स्वामी काय सांगतो याचा विचार केला, तर प्रश्न हा भरणी नक्षत्रात विचारला, त्याचा स्वामी शुक्र आणि शुक्र चतुर्थी स्थानी (घरी घेईल/सापडेल), मीन रास या ठिकाणी (जल तत्वाची रास), शुक्र बुधाच्या नक्षत्रात आहे, बुध चतुर्थात, सप्तमेश (बाधक स्थान), दशमेश (११ चे व्यय) आणि हा शुक्र मंगळाच्या सब मध्ये आहे मंगळ ६ (पोलीस आधार), १२ व्या स्थानाचा अधिपती (हॉस्पिटल, धोका) आणि वृश्चिक रास (साचलेला डबके अथवा गटार) असे दर्शवितो कि दशा देखील पूर्णत: नकारात्मक झाली आहे जातकाच्या जीवाला धोका आहे हे मात्र आता निश्चीत वाटत होते. तरी देखील रुलिंग प्लानेटचा आधार घेऊन समोरील व्यक्तीस आपण पोलिसांची मदत घ्यावी आणि जातक हे मंगळवार ते शुक्रवार पर्यंत सापडतील असे संगीतले, ५-९ भावामुळे ते कदाचित जीवित असतील असे हि सांगितले. परंतू प्रश्न कुंडली अगदी बरोबर सांगत होती, जातकचा मृतदेह मंगळवारी सूर्यास्तापूर्वी त्यांच्याच घरातील मागच्या बाजूच्या डबक्यात तरंगत होता आणि पुढील तपास हे पोलीस करती आहेत.
याच कुंडलीत अजून खूप बारकावे आहेत विचार केला तर प्रत्यक घटनेचे उत्तर मिळते असो कधी कधी कुंडलीत नकारात्मक गोष्टी दिसत असल्यातरी समोरील व्यक्तीस सांगण्याचे धाडस होत नाही, खूप विचार करून समर्पक उत्तर द्यावे लागते. हरवलेल्या व्यक्तीची जन्म कुंडली तपशील प्राप्त झाला आहे, पुढील भागात जन्म कुंडलीचे विवेचण पाहूया...!!! ॐ शांती !!!






कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा