शुक्रवार, ३ सप्टेंबर, २०२१

“अकाल मृत्यु हरणं” असे हे वास्तुशास्त्र

 

ज्योतिष विचाराचा दृष्टीकोन हा व्याप्त असला पाहिजे. ज्यावेळी कुंडली चांगली असून देखील जातक हा कुठल्याना कुठल्या कारणामुळे त्रासदी भोगत असतो..अशावेळी असही लक्षात येते कि जो त्या नवीन वास्तू मध्ये राहण्यास जातो तेव्हा पासून त्रासाची तीव्रता वाढली आहे. मग प्रश्न असा आहे हे शास्त्र केवळ जन्म कुंडली पर्यंत सीमित नसून त्याची व्याप्ती, वास्तू, ज्योतिष, संगीत, आयुर्वेद, आणि योग यामाध्यामातून देखील असून, या माधमातून उपायशास्त्राची फलश्रुती तो घेऊ शकतो आणि सुलभ आनंदी जीवन जगू शकतो.

 

रोजच्या दैनंदिन ज्योतिष वास्तू अभ्यास सुरु असतो आणि हाच अनुभव माझ्याकडे येणाऱ्या जातकाला मी देत असतो आणि तळमळ करून सांगत असतो, की पुढे धोका आहे...!! बाकी त्याचे प्रारब्ध...!!! असाच एक अनुभव मला एक वास्तू visit गेलो असता आणि परीक्षण करताना आला ते आपला बरोबर शेअर करीत आहे.

 

वास्तूमध्ये तत्त्व, उर्जा, देवता, दिशा आणि ग्रह यांचा परस्पर होणारा परिणाम जातकावर कसा होतो हे पुढील उदाहरणवरून देसून येईल.  ज्यावेळी भूमीचा प्लव (उतार) विपरीत असतो त्यावेळी भावनातील उर्जा विस्कळीत होते त्याचे भयंकर परिणाम भोगावे लागतात. दक्षिण-नैऋत्य-पश्चिम उतार, जलाशय गड्डा, विहीर  बोरवेल असेल तर अस्त उर्जाचा प्रभाव वाढतो आणि उत्तर-ईशान्य-पूर्व या प्राणवाहक दिशांचा प्रभाव घटतो आणि दक्षिनेच्या यम, पश्चिमेस असुर तर नैऋत्यच्या पिशाच्य शक्तीचा अंमल घरावर राहतो.  दक्षिण-नैऋत्य स्पंदनामुळे मृत्युतुल्य पिडा तर पश्चिमेच्या स्पंदामुळे सर्वत्र कलहाचे साम्राज्य पसरते.



पुढील सदर प्रोजेक्ट मागील ४ ते ५ वर्षापासून रखडला आहे. सुम्पूर्ण बिल्डींग तयार झाली आहे, एकूण ६ प्लेट आहे, केवळ दरवाजे आणि फिनिशिंग चे काम बाकी आहे परंतु जातक ह्या कामापर्यंत पूर्ण कर्जमध्ये बुडाला असून, पार्टनरने देखील धोका दिला आहे. बिल्डिगमध्ये ईशान्य दिशेला जिना लिफ्ट असून त्याचे टॉवराची उंची साधारण १८ फुटापर्यंत वाढलेली आहे याचा अर्थ प्राणिक उर्जाचे लोप झाला असून हि दिशा संधी देणारी असते आणि त्याचा देखील लोप झाला आहे.  प्लॉटचा आकार बघितला तर नैऋत्य दिशेला cut असून वाढ देखील आहे आणि सर्वात महत्त्वाचे महणजे प्लॉटचा सर्पूर्ण मोठा उतार हा दक्षिण-पश्चिम भागमध्ये आहे आणि नैऋत्य दिशेत बोरवेल घेतलेलें आहे, त्यामुळे प्राणिक उर्जा प्रवाह घाटला आणि अस्त उर्जाचा प्रभाव वाढला आहे. बघा जातकाचे वडीलाचे अचानक मागच्या दोन वर्षापूर्वी मृत्य झाला तर त्याचा आईचे देखील दोन ऑपरेशन झाले असून सध्या बिछाना धरून आहे. जातकाला मागील ४ वर्षापूर्वी पासूनच राहूची महादशा सुरु आहे आणि राहू हा कुंडलीत चतुर्थ स्थानी आहे त्यामुळे वास्तू आणि पितृ दोष दर्शवतो आणि भोगण्यासाठी मनुष्याला दुर्बुद्धी सुचते आणि काही विचार न करता विपरीत वास्तू प्रोजेक्ट तयार झाला आणि आज एक हि प्लेट विकला चलाला नाहीये, १०-२०% जी लागत लागली आहे त्यापेक्षा कमीने विकण्याचा प्रयत्न ते करीत आहे पण तरीदेखील प्लेट विकले जात नाहीये.

 

काही उपाय त्याठिकाणी केले आहे. भूमी चा प्लव सुधारण्यास त्यांना सांगितले आहे. बोरवेल बंद करण्यास सांगितले आहे. उत्तरेस underground tank केली आहे. आजूनही बरेच उपाय सांगितले आहे.  हीच खरी मुळ  पारंपरिक उपाय शास्त्र पद्धती आहे. ना कि पिरामिड, कुठलेही प्रकारचे यंत्र हे जडत्व आणि भूमीचा प्लव ठीक करत नाही हे लक्षात घ्यावे.


दिपक चं. पिंपळे – ९८२३४४८४४९ 

 

!! शुभम् भवतु !!

 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा