रविवार, १० मार्च, २०१३

आयुष्याची डोर ही परमेश्वरच्या हाती..!

|| श्री स्वामी समर्थ ||

नमस्कार,

मागिल रविवारी एका जातकाचे नातलग आमच्याकडे हे जातक आजारी आहे व ते कधी बरे होईल असा प्रश्न घेउन आले. रविवार असल्याने आमच्या नित्याचा कमाला सुट्टीच होती.  आमचे 'श्रीपाद चरित्राचे' पारायण आमच्या स्वामी मठात सुरु होते त्यामुळे हे जातकाचे नातलग ओफिसमध्ये आमच्या येण्याची वाट पाहत होते.

आम्ही नंतर काम्पुटर सुरु केले यादरम्यान जातकाला कुठला आजार झाला आहे, त्याचे स्वरूप काय आहे, ही माहिती घेणे आवश्यक होती. त्यांच्याकडून कळाले की जातकाचे किडनी ट्रान्सप्लांट झाले आहे व ते मागील तीन-चार दिवसापासून त्यांचा विकनेस वाढला असून डॉक्टरचे मार्गदर्शन चालूच आहे परंतु यात ज्योतिष मार्गदर्शन मिळेल का ? यासाठी ते विचारनी करू लागले.

जातक: प्रवीण उमाटे     जन्म दिनांक: ०९/०९/१९७४     जन्मवेळ: ६:१३ मीनटे      जन्म स्थळ: नांदेड

आम्ही जातकाचे सर्वे डीटेल घेउन कुंडली मांडली. आजाराचे गांभीर्य व स्वरूप पाहता प्रथम के.पी च्या माध्यमातून जातकाचे आयुष्मान किती आहे हे पहावे लागते. यासाठी प्रथम लग्न भावाचा सबवरून आयुष्यमान बघितले. लग्न भावाचा सब हा शनी आहे व तो बलवान आहे कारण त्याच्या नक्षत्रात कुठलाच ग्रह नाही.
SATURN* : -10, 7, 11                           दीर्घयुशी १-५-९-११         पैकी ५-११    बलवान कार्येश
2-Star-Lord is JUP: 6, 5, 8                     आल्पआयु २-६-७-८-१२ पैकी  ६-७-८-१२ बलवान कार्येश
3-Sub-Lord is SAT: 10, 7, 11                 हे दोन्ही भाव असल्याने जातक हे माध्यमआयु असे सांगता येते.
4-Star-Lord of SubLord is JUP: 6, 5, 8  के. पी. मध्ये  ३३ ते ६६ हे वय मध्यमआयुचे मानले आहे.

जातकास  गंभीर स्वरूपाचा आजार असून प्रकृती खालवत चालली होती त्यामुळे येथे दशास्वामी हे फार महत्वाचे होते. जातकास प्रश्नवेळी गुरु-शुक्र-चंद्र ही दशा १५/५/२०१३ पर्यंत होती.
JUPITER : -                                 महादशा स्वामी गुरु हा आयुष्यसाठी पूर्णत: विरोधी भावाचा बलवान कार्येश
2-Star-Lord is RAH: 3, 1 , 4, 4               (८ भावाचे अष्टम स्थान) (अंतिम चिरशांती)
3-Sub-Lord is MON: 9                           (सिंह हे स्थिर लग्न त्यामुळे हे स्थान बाधक ठरले)
4-Star-Lord of SubLord is MON: 9            (२ व ७ हे मारक भाव असतात.)


VENUS : -                                     अंतरदशास्वामी  शुक्र हा केवळ १ -११ या सकरात्मक भावाचा कार्येश  
2-Star-Lord is KET: 9, 12, 10                             ९ (बाधक) १२ (व्यय व हॉस्पिटलचे स्थान)
3-Sub-Lord is RAH: 4                                         ४ (अंतिम चिरशांती)
4-Star-Lord of SubLord is MER: 1 , 2, 11           २ (मारक)
याच प्रमाणे विदशास्वामी चंद्र व शुक्ष्मदशा स्वामी हा राहू (कुठल्याही प्रकारे डायगनोस होउ देत नाही) ची दशा ही १९/०३/२०१३ पर्यंत असून गोचर भ्रमण हे देखिल जातकाच्या आयुष्यास धोकादायक होते.

वरील सर्वेगोष्टी हे जातकाच्या नातलगास सांगितल्या व उपाय म्हणून आम्ही त्यास पुरोहीताकडून प्रथम "महामृत्यूंजयाचा जाप" करून घ्यावा व जातकाच्या पत्नीस शनीप्रदोषाचे व्रत कारन्यास सांगितले व त्यानुसार त्यांनी ६/३/२०१३ रोजी हा जाप करण्यासाठी पुरोहिताना घरी बोलाविले व जातकाकडून संकल्प देखिल केला व जपास प्रारंभ केला व कालच्या शनिवारी जातकाच्या पत्नी शनीप्रदोषाचे व्रत करणारच होती परंतू हे नियतीला मान्य नव्हते का कुणाच ठावूक, जातकाची गुरुवारी तब्यत बिघडली व हॉस्पिटलमध्ये भरती करावे लागले. या भयंकर आजारातच त्यांना कावीळ झाला, व दुसरी किडनी फेल झाली व शुक्रवारी दुपारी ३:३० रोजी जातकाचे देहवसान झाले. असे हे ग्रह व दशास्वामी..!

आयुष्याची डोर ही त्या परमेश्वरचाच हातात असते हे त्रिवार सत्य..! काल शनीप्रदोषाच्या दिवशीच जातकाचा अंत्यविधी झाला. त्यांच्या आत्म्यास शांती मिळो ही त्या शंभो महादेवाकडे प्रार्थना...!
!! ॐ नम: शिवाय !! 
!! ॐ शांति: शांति: शांति: !!
  आपला,
Preview
  

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा