गुरुवार, २१ मार्च, २०१३

जातक हो...! प्रश्नकुंडलीस महत्त्व द्या..!

|| श्री स्वामी समर्थ ||
नमस्कार,

जातकास आम्ही ज्यावेळी १ ते २४९ मधील के.पी. नंबर विचारतो तेंव्हा त्याचे महत्त्व काय आहे हे ओळखले  पहिजे. प्रश्नकुंडलीस देखिल जन्मकुंडली एवढेच महत्त असते हे जाणले पाहिजे, ना की आम्ही एखादा नंबर विचारतो व जातक हे आपला लक्की नंबर किंवा फेवरेट नंबर सांगतात हे आमच्या लक्षात येते ज्यावेळी चंद्र हा निगडीत प्रश्नांचे स्वरूप दर्शवित नाही.

जन्मवेळेत थोड्याफार मिनिटाचा फरक आढळून येतो त्यामुळे सब हा बदलतो व विवाह, नोकरी, नोकरीतील बदल ह्या सारख्या प्रश्नांचा कालनिर्णय हा प्रश्नकुंडलीवरून अगदी अचूक येतो व त्याची प्रचीती नेहमी येते. 

सदर जातक हे काल आमच्याकडे आले, रविवार पासून आम्हास भेट घेण्याचा प्रयत्न करीत होत परंतू आम्ही त्यास वेळ देऊ शकलो नाही. रविवारी सर्वे डिटेल्स व तसेच एका ज्योतिष अभ्यासकाचा रेफरन्स कागद ही ठेवला. त्या ज्योतिषाचा आम्हास फोन देखिल आला व जातक हे काल अर्ध्या दिवसाची सुटी घेउन धडपड करीत ४:३० नंतर फोचले अशी ही त्यांची प्रश्न बघण्याची तीव्र ओढ पाहून आम्ही त्यांचा प्रश्न हा प्रथम प्रश्नकुंडली वरून सोडवायचा ठरविला.

के.पी. नंबरचे महत्त्व काय हे त्यांना माहित होते. आम्ही त्यास नंबर विचारला त्यांनी चटकन ९६ सांगितला व कुंडली मांडली व कुंडलीवरून व्यवसायात पदार्पण व यश मिळेल का ? असा प्रश्न पहिला व नंतर आम्ही त्यांच्या  जन्मकुंडलीवरून कालनिर्णय केला तो अगदी जुळत होता एवढेच नव्हे तर जन्म व प्रश्न कुंडलीत किती साम्य हे देखिल आभ्यासानिय आहे.
 प्रश्न कुंडलीत चंद्र ११ स्थानी (ईच्छापुर्ती) तो चंद्र हा व्येयेश (व्यवसायात गुंतवूनक) दर्शवितो. आता पहा चंद्र हा जन्म व प्रश्न कुंडलीत मिथून राशीतच आहे.  जाताकास जन्म राहूच्या महादशेत झाला असून जातकाने काल प्रश्न विचारला त्यावेळी राहूचे नक्षत्र सुरु होते, प्रश्न कुंडलीत व जन्म कुंडलीत बुध-नेपच्यून ७ स्थानी व शुक्र व मंगळ ८ स्थानी आहे.

सर्वात महत्त्वाचे म्हणजे दोन्ही कुंडलीतील केलाला कालनिर्णय हा सारखा येतो परतू १५ ते २० दिवसाचा फरक आढळतो अशावेळी प्रश्न कुंडलीस महत्त्व द्यावे लागेल. अशापद्धतीची कुंडली आम्ही ठाणे येथील ज्योतिष संमेलनामधे सादर व विवेचन केले होते व आमच्या या ब्लोगवर मागे मांडली होती. अभ्यासकांनी निश्चित वाचावी. (प्रश्नकुंडलीस जन्मकुंडली एवढेच महत्त्व (ठाणे ज्योतिष संमेलन)

लोकांना जेंव्हा जन्म वेळ-तारीख माहित नसते हीच प्रश्न कुंडली महत्त्वाची ठरते त्यामुळे  जाताक हो..!  प्रश्नकुंडलीस महत्त्व द्या..!

आपला,
Preview



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा