बुधवार, १९ जून, २०१३

” हम गया नही, जिंदा है “

"अक्कलकोट पुण्यभूमी थोर जेथे प्रत्यक्ष दत्त वसे”

इसवी सन 1856 मध्ये स्वामी महाराजांनी अक्कलकोट प्रवेश केला.व तेथल्या बावीस वर्षांच्या वास्तव्यात सर्व विश्वाला दैदिप्यमान असे तीर्थक्षेत्र अक्कलकोट करून जगातील अनेक मान्यवरांना मार्गदर्शन केले.‘चैतन्य स्वामी’ हे त्यांचे मुळ नाव . हिमालयात वास्तव्य ,सर्व भारतभर भ्रमण ‘.चंचल भारती‘ हे नाव हि द्रुतगतीच्या प्रवासामुळे लाभले असावे , मग ‘दिगंबर बुवा’, मग अक्कलकोटचे स्वामी ,’ श्री स्वामी समर्थ’ हेच नाव , जे आज एक स्वयंभू मंत्र झाले आहे.

स्वामींचे वर्णनविशेष

स्वामींचे वर्णनविशेष म्हणजे ते दाशरथी रामाप्रमाणे आजानुबाहू होते . उंची सहा फुटांपेक्षा जास्त , विशाल छाती ,रुंद खांदे ,उगवत्या सूर्याप्रमाणे बालरवी,अरुणाप्रमाणे तेज:पुंज भगवी कांती ,तर चरणकमलांची नाजूकता कमलदलाप्रमाणे मृदुल, चंद्रबिम्बाशी स्पर्धा करणारे तेजोवलय चरणांच्या भोवती , करारीपणा दाखविणारी नासिका , कर्ण श्री गजाननाप्रमाणे व त्यात डुलणारी शोभिवंत कुंडले , दृष्टी अत्यंत भेदक. परंतु , भेदक दृष्टी च्या पलीकडे गेलात कि, मूर्तिमंत वासल्य ओसंडताना दिसते . रौद्र मुद्रेच्या पलीकडे प्रसन्न मुद्रा दिसेल.

स्वामी स्वत: संबधी फारसे बोलत नसत …काही मंडळी एकत्र आली असता एका गृहस्थाने स्वामिना विचारले ,”आपण कोण?” स्वामिनी उत्तर दिले-”दत्तनगर,मुळ पुरुष – वडाचे झाड-मूळ मूळ “

तरीपण अधिक खुलासा व्हावा म्हणून एका गृहस्थाने प्रश्न केला ,“स्वामी आपले गोत्र काय?” स्वामी म्हणाले ” .आम्ही यजुव्रेदि ब्राह्मण,नाव नृसिंहभान ,कश्यप गोत्र, मीन लग्नरास, पुन्हा विचारल्यास टाळक्यात पायपोस“

सूत्ररूपाने बोलत .’दत्तनगर ‘ म्हणजे दत्ताने दिलेले किवा दत्ताच्या ठिकाणाहून आलेले ,’मूळ पुरुष’म्हणजे आदिपुरुष म्हणजेच साक्षीस्वरूप परमात्मा . ‘वडाचे झाड म्हणजे मूळ परमात्म शक्तीपासून जीवांचे असेच खाली खाली अवतरण होत अस्तेख़लि अवतीर्ण झालेल्या जीवांची मुळे हि वर असतात वडाच्या वृक्षापासून पारंब्या खाली खाली येतात निर्गुणातून सगुणात येताना किवा अव्यक्तातून व्य्क्तात येतान,वरून खाली हाच क्रम असतो ,तोच ‘वडाचे झाड ‘ या शब्दाने सुचित केला आहे. मूळ मूळ म्हणजे मुल किवा आद्य प्रकृती योगमाया असा आहे ।आत्म मायेच्या रूपाने मी पुन:पुन्हा संभवतो असे भगवंताचे म्हणणे आहे.

स्वामी समर्थ क्षणात अंतर्धान पावत व अचानक प्रगट होत. स्वामी गिरनार पर्वतावर गुप्त झाले व क्षणात आंबेजोगाई येथे प्रगट झाले. हरिद्वारहून काठेवाडातील जिविक क्षेत्रातील नारायण सरोवराच्या मध्यभागी सहजासन घालून बसलेले दिसले. नंतर पंढरपुरातील भीमा नदीच्या भर पुरातून चालत जाताना भक्तांनी पहिले.

“स्वामीना तूळस, भगव्या रंगाची फुले आवडत असे स्वामी सूत सांगतात ;ते एके ठिकाणी म्हणतात ::
” परी हो स्वामीसी आवडे भगवे फूल !
भगव्या फुलाची माळ ती सगुन !करोनिया तुम्ही चरणी अर्पा !!



श्री स्वामी समर्थ

श्री स्वामी समर्थाना खाण्याच्या पदार्थात “बेसनाचे लाडू “,”पूरण पोळी” ,कड्बोळी व “कांद्याची भजी” त्याना विशेष अ!वडत असे.
स्वामी कुत्रा, गायीवर खुप प्रेम करत असत…!!

इसवी सन १८५६मध्ये स्वामी महाराजांनी अक्कलकोट गावात प्रवेश केला व तेथे पुढची बावीस वर्षे वास्तव्य केले. त्यांच्या अक्कलकोट येथे राहण्यामुळे अक्कलकोट हे गाव सर्व विश्वाला देदीप्यमान असे तीर्थक्षेत्र समजले जाऊ लागले. येथे राहून स्वामी समर्थांनी जगातील अनेक मान्यवरांना मार्गदर्शन केले. आणि इसवी सन १८७८मध्ये1 आपला अवतार संपवला. आपल्या पार्थिव देहाचा त्याग केला असला तरी ”हम गया नही, जिंदा है l ” हे त्यांचे वचन भक्तांना आधार आहे. ज्या ज्या वेळी त्यांचे स्मरण केले जाते, त्या त्या वेळी श्री स्वामी समर्थ आपणापाशीच असतात, हे निश्चित. परंतू प्रत्यक्षात स्वामी महाराज आज 2009 मध्ये देखील भक्तांच्या पाठीशी सतत राहून त्यांना मार्गदर्शन करून कार्यरत करीत आहेत व अनंतकाळ पर्यंत करीत राहतील.


फोटो व लेख सौजन्य: श्री प्रशांतजी कुडाळकर 

1 टिप्पणी: