रविवार, १३ जानेवारी, २०१३
बुधवार, ९ जानेवारी, २०१३
जन्मवेळ निश्चिती (किमया शासक ग्रहांची)
|| श्री स्वामी समर्थ ||
नमस्कार,
ज्योतिष शास्त्रामध्ये जन्मवेळ निश्चित करण्याच्या
वेगवेगळया पद्धती आहेत, परंतु कृष्णमूर्तीपद्धती मध्ये रुलिंग प्लानेटसच्या (शासकग्रह) आधारे लग्नशुद्धी तसेच जन्मवेळ ही निश्चित करणारी पद्धती अतिशय सहज व उत्तम आहे
त्यामुळेच हजबे गुरुजींनी यास 'यक्षियणीची कांडी' म्हटले आहे. याच शासक ग्रहाचा वापर करून कोणत्याची
प्रश्नांचे निश्चित कालखंड सांगता येतो यासाठी हवे असते तर तारतम्य व सामान्यज्ञान.
काल जातकाच्या पत्नीने जातकाचे डीटेलस् या ब्लॉगच्या माध्यमातून आमच्या पर्यंत पोहचविल्या व पुन्हा फोन करून जातकाच्या जन्मवेळ ह्या दोन वेगवेगळ्या आहेत, एक वेळ ही ११:४५ रात्री तर दुसरी ही १२:४५ त्यामुळे नेमकी वेळ कुठली आहे यामध्ये नेहमी कन्फुजन असते असे त्या म्हणाल्या. मी त्यांना आज सायंकाळी भेटण्याची वेळ दिली.
आमच्या पोटापाण्यासाठी चालणारा संघानाकावरचा व्यवहार हा आज दुपारीच संपला होता व आज भेट देणाऱ्या जातकापैकी या जाताकाच्या जन्मवेळ दोन लिहिलेल्या बघीतल्यावर जन्मवेळ निश्चित करण्यासाठी आम्ही काम्पुटरमधील ज्योतिषचा पसारा उघडला व रुलींग प्लानेटसची नोंद घेतली ती पुढील प्रमाणे.
L: (लग्न स्वामी) - मंगळ
LS: (लग्न नक्षत्रस्वामी) - केतू
S: (नक्षत्रस्वामी) - बुध
R: (राशीस्वामी) - मंगल
D: (वारस्वामी ) - बुध
जेंव्हा रुलिंगमध्ये चार पेक्षा कमी ग्रह असतात त्यावेळी लग्न स्थावर दृष्टी ठेवणारे तसेच लाग्नेशाच्या युती-दृष्टीतील ग्रहांचा देखील रुलींगच्या ग्रहामध्ये उपयोग करावा लागतो.
याठिकाणी राहू व शनी ची दृष्टी हि लग्न भावावर असून गुरुची दृष्टी ही लग्नेश मंगळावर आहे. त्यामुळे राहू, शनी व मंगळ हे देखील अप्रत्यक्षपणे रुलिंगमध्ये आहे. याचा उपयोग करून जन्मवेळ निश्चित करावी लागेल. जातकाचे माहिती पुढीलप्रमाणे आहे.
जातक: पुरुष
जन्म दिनांक: २६/०३/१९६४ किंवा २७/०३/१९६४ (वेळ बदल झाल्याने तारीख बदलली)
वेळ : रात्री २३:४५ मी. / ००:४५ मी.
जन्मस्थळ: चंद्रपूर
वरील दोन्ही वेळेच्या कुंडली मांडल्या:
वेळ : २३:४५ वेळ : ००:४५
लग्न : वृश्चिक २६'१२''४५ लग्न : धनु ९'५२''५९
लग्नभाव: वृश्चिक: मंगळ-बुध-गुरु लग्नभाव: धनु :- गुरु-केतू-शनी
वरील निरीक्षण केल्यास लक्षात येती की - मंगळ हा रुलिंगमध्ये प्रथम दर्जेचा ग्रह आहे तसेच बुध हा देखील ग्रह वृश्चिक लग्नामध्ये आहे व लग्न भावाचा सब गुरु हा देखील रुलिंगमध्ये अप्रत्यक्षपणे आहे त्यामुळे जातकाची वेळ ही २३:४५ आहे हे निश्चित होते.
जातकाच्या पत्नीने सायंकाळी जातकाची जुनी पत्रिका सापडली आहे व त्यात २३:४५ ही वेळ नमूद केली आहे असे सांगितले तत्त्पुर्वी आह्मी या वेळेची पत्रिका दुपारीच तयार केली आहे व आम्ही त्यास ते दाखविले. जिवनातील सर्व घटना ह्या वेळेशी जुळवून येतात हे देखील सिद्ध केले. त्यांनी आमच्या या आत्माविश्वासाचे कौतुक केले.
या कौतुकाचे पात्र आम्ही नसून गुरुवर्य कृष्मूमूर्ती व ही पद्धती आहे यात शंकाच नाही.
आपला,

रविवार, ६ जानेवारी, २०१३
बुधवार, २ जानेवारी, २०१३
मोक्षम् देही राहू
|| श्री स्वामी समर्थ ||
नमस्कार,
सध्या New Year मुळे आमच्या कामाचा ओघ थोडा कमी आहे त्यामुळे सकाळच्या वेळी आह्मी थोडे निवांत असतो . या ब्लॉगच्या निमित्याने आम्ही फेसबुक सारख्या सोशल नेटवर्क संभध आला त्यातील एक ग्रुप या आमच्या शास्त्राला नावे ठेवण्यात फुढे आहे. अशांना आम्ही काय सांगावे.... असो..!
काल एक जातक आपली जन्मपत्रिक घेउन आले. समस्या व अडचणींची लिस्ट तपशीलवारपणे आमच्या समोर मांडली. जन्मपत्रिका ही हाताने बनविलेले जीर्ण झालेली होती, ग्रह हे पुसट व ग्रहांचे मागील व पुढील अक्षरे दिसत नव्हती ते पाहून पुन्हा मनात म्हटले की कधी जातक आपल्या १२ चौकटीच्या या कुंडलीला महत्व देतील. आम्ही या जीर्ण झालेल्या या पत्रिकेचा उद्धार तर केला, परंतु त्याच्या दैवाचा उद्धार मात्र स्वामी महाराजवर सोडविला.
पत्रिका बनवून झाल्यावर व निरीक्षण केल्यावर आम्ही त्यास काही प्रश्न विचारले ते असे की आपल्या घरात वडील, भावंड, किवा काका यापैकी कोणी अग्नी तत्वाचे निधन झाले आहे असे दिसून येते यावर ते जातक दोन मिनिटे स्तब्ध झाले व एकसारखे माझ्याकडे पाहत होते व त्यांनी हळुवारपणे सांगितले की वडील व बहिण दोघेही आगीत जळून मृत पावले आहेत. आम्ही हे कसे ओळखले म्हणजेच diagnosis कसे केले असे ते विचारणी करू लागले. त्याचे विवरण आम्ही खाली दिलेच आहे व शास्त्राची प्रचीती कशी येती हे पुन्हा सिद्ध होते.
जातक: पुरुष जन्म दि. १०/०४/१९७७
जन्म वेळ: स. ५:३० जन्म स्थळ : औरंगाबाद
राहू व मंगळ दोन्ही ग्रह निरीक्षण केल्यास लक्षात येते की राहू हा अष्टमस्थानी (मृत्यू स्थान) आहे व तो मंगळच्या नक्षत्रात आहे व मंगळ हा १२ व्या स्थानी (मोक्ष स्थान) आहे. हा मंगळ नवमेश (पित्याचे स्थान) आहे व तो शनी (मृत्यू कारक) च्या राशीस असून हा शनी लाभेश (काका, मित्र, मोठा भाऊ) आहे. मंगळ (अग्नी तत्त्व) हा गुरुच्या नक्षत्रात आहे व गुरु हा वृषभेला (शुक्र - त्रीतेयेश - लहान बाहीण) आहे. रवि (वडिल कारक) व शुक्र युती प्रथम स्थानी मीन या मोक्षम् राशीत आहे व राहू व मंगळाचा भावाचलित कुंडलीत मध्ये षडाष्टक योग आहे.
वरील सर्व तत्त्वाचा विचार केल्यावर आह्मी जातकाचे वडील किंवा भावंडे अग्नी तत्त्वाने मृत्यू झाला असेल असा निष्कर्ष काढाला व तो खरा ठरला. ही केवळ एक कुंडली नसून आशा कुंडल्याचा संकीर्ण आमच्याजवळ आहे त्यामुळे शास्त्र आहे त्याचा आभ्यास निट पाहिजे काही मुठभर लोकांमुळे शास्त्राला नाव ठेवणे कितपत योग्य आहे ते आपणच ठरविले पाहिजे. दोन भिन्न चित्र एकत्रित करून काही वेगळे भासवीणाऱ्याना स्वतः आत्मपरीक्षण केले पाहिजे.
आपला,

रविवार, ३० डिसेंबर, २०१२
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)
![आज पौष शुध्द २ , श्रीमद नृसिंह सरस्वती स्वामी महाराज यांची जयंती
दुपारी १२ वाजता महाराजांचा जन्मकाळ , जन्म स्थान : कारंजा. जन्मोत्सव श्री क्षेत्र नृसिंहवाडी.
माधवस्त्री अंबिका कारंज सती थोर l पूर्वजन्मी तिजसि श्रीवल्लभ वर ll
पुढील जमनी तव कुशि धरीन अवतार l म्हणवूनी आंबे कुशि आले ऐका तिथिवार ll
द्वितीया पौष शुध्द शततारावरी,l माध्यान्ही अवतरले नरहरि शनिवारी ll
आदौ माघ कृष्ण शुभ तिथी भृगुवारी l पुष्पासनी आरुढले त्रिगुण यतिधारी ll
जयदेव जयदेव जयजय त्रिगुणात्मा l श्री दत्त श्रीपाद नरहरी परमात्मा जयदेव जयदेव ll
कारंजा येथील नृसिंह स्वामींचे जन्मस्थान , "काळे वाडा".
श्री नृसिंह सरस्वतींचे संक्षिप्त चरित्र खाली दिले आहे.
सौजन्य : @[100001089557116:2048:Shripad Joshi],श्री. श्रीपाद जोशी, श्री क्षेत्र नृसिंहवाडी (नरसोबाची वाडी). मनपूर्वक आभार श्रीपाद जी.. :)
श्री नृसिंह सरस्वती - संक्षिप्त चरित्र (इ.स. १३७८ ते १४५८)
श्री नृसिंह सरस्वती हे श्री दत्तात्रेयाचे दुसरे अवतार. श्रीपाद श्रीवल्लभ हा पहिला अवतार. त्यांनीच करंजनगर नावाच्या गावी जन्म घेतला. त्यांच्या वडिलांचे नाव माधवराव व आईचे नाव अंबाभवानी असे होते. पती-पत्नी दोघेही शिवभक्त होते. मुलाचे नाव जन्मतःच शाळिग्रामदेव असे ठेवले. नंतर मोठ्या थाटाने त्याचे बारसे साजरे करून नरहरी हे व्यावहारिक नाव विधीपूर्वक ठेवण्यात आले.
जन्मतःच हे मूल 'ॐ' कार हा शब्द म्हणू लागले. बालक मोठे होऊ लागले. तीन वर्षाचे झाले तरी 'ॐ' काराखेरीज एकही दुसरा शब्द ते बोलत नव्हते. मुलगा सात वर्षाचा झाला तरीही 'ॐ' काराशिवाय काहीही बोलू लागला नाही. माधवराव व अंबा भवानी मनात फार कष्टी झाले. त्यांनी शिवपार्वतीची आराधना केली. त्यांच्या कृपाप्रसादाने आम्हाला मुलगा झाला, तोही मुका असावा, या गोष्टीमुळे ते पती-पत्नी खूप दुःखी बनली.
एक दिवस अंबाभवानी नरहरीला जवळ घेऊन म्हणाली, ''बाळ, तू अवतारी पुरुष आहेस, युगपुरुष आहेस, असे ज्योतिषी सांगतात. आमच्या भाग्याने तू आमच्या घरी जन्माला आलास. तू जगद्गुरू असावास याबद्दल आमची खात्री झाली आहे. तू शक्तिमान आहेस. तू बोलू का लागत नाहीस? तुझे बोल ऐकण्याची आमची इच्छा आहे. तेवढी पुरी कर !'' मुलाने मातेचे हे उद्गार ऐकून खुणेने सांगितले की, माझी मुंज करून दिलीत की, मला सगळे काही बोलता येईल !''
व्रतबंधाकरिता मुहूर्त ठरविण्यात आला. सर्व तयारी केली. मुंजीला चतुर्वेदी ब्राह्मण आमंत्रित केले. मुंजीचा सोहळा पाहण्यास अलोट गर्दी लोटली. माधवरावांनी नरहरीच्या कमरेभोवती मौजीबंधन केले व ठरलेल्या शुभ मुहूर्तावर त्याच्या कानात गायत्री मंत्राचा तीन वेळा उच्चार केला. नरहरीने मनातल्या मानत गायत्री मंत्राचा उच्चार केला. उघडपणे केला नाही. लोक हसले; म्हणाले, ''मुका मुलगा गायत्री मंत्र काय उच्चारणार?''
अंबा भवानी या त्याच्या आईने पहिली भिक्षा देऊन त्याला आशीर्वाद देताच त्याने ऋग्वेदातील प्रथम मंत्राचा स्पष्टपणे उच्चार करून, ऋग्वेद म्हणून दाखवला. दुसरी भिक्षा घालताच यजुर्वेदातील प्रारंभीचा भाग व यजुर्वेद म्हणून दाखवला. आईने तिसरी भिक्षा घालताच त्याने सामवेदाचे गायन करून दाखवले. माधवराव व अंबाभवानी यांना अत्यंत आनंद झाला. मुका मुलगा चारी वेद बोलून दाखवू लागला, हे पाहून लोक आश्चर्यचकित झाले.
नरहरी आपल्या आईला म्हणाले, ''आई, मला आता निरोप दे. तीर्थयात्रेला जावे असा मी निश्चय केला आहे. घरोघरी भिक्षा मागून, ब्रह्मचर्याचे पालन करून, वेदाभ्यास करावा असा माझा मानस आहे.'' हे ऐकून आईला फारच दुःख झाले.
''जेव्हा माझे चिंतन कराल, मला भेटण्याची उत्कंठा वाटेल तेव्हा मी तुम्हाला मनोवेगाने येऊन भेटेन.'' असे नरहरीने आश्वासन दिल्यावर त्याच्या आई-वडिलांनी त्याला संन्यासदीक्षा घेण्यास मान्यता दिली.
नरहरी प्रथम काशीक्षेत्र या ठिकाणी गेले. तेथे त्यांनी अध्ययन केले. कृष्ण सरस्वती यांचा अधिकार जाणून नरहरींनी त्यांच्याकडून दीक्षा घेतली व त्यानंतर ते नृसिंह सरस्वती या नावाने प्रसिध्द झाले.
श्री गुरु नृसिंह सरस्वतींनी दक्षिणेकडील निरनिराळ्या तीर्थांना भेट दिली. नरसोबाची वाडी येथे बारा वर्षे राहून त्यांनी लोकोद्धाराचे प्रचंड कार्य केले. पुढे ते गुप्त रूपाने संचार करीत गाणगापूर येथे प्रगट झाले. त्यांचे असंख्य शिष्य होते. श्री गुरूंनी सर्व शिष्यांना बोलाविले आणि सांगितले की, ''आम्ह्ची प्रसिद्धी फार झाली आहे. यापुढे गुप्त राहावे असे मनात आहे. मी तुम्हाला सोडून जात नसून फक्त गुरुरुपाने येथे राहणार आहे.
जे जे असती माझ्या प्रेमी l
त्यांते प्रत्यक्ष दिसे नयनी l
लौकिकमते अविद्याधर्मी l
जातो श्रीशैल्ययात्रेसी ll
श्री गुरु म्हणाले, ''जे लोक माझी भक्ति करतील, मनोभावे माझे गुणगान करतील, त्यांच्या घरी आम्ही सदैव राहू. त्यांना व्याधी, दुःख आणि दारिद्र्याचे भय असणार नाही. त्यांच्या सर्व मनोकामनांची पूर्ती होईल. माझे चरित्र जे वाचतील त्यांच्या घरी निरंतर लक्ष्मी, सुख व शांति लाभेल, असे सांगून ते त्यांच्या इच्छेनुसार भक्तांनी केलेल्या फुलांच्या आसनावर बसले. ते आसन नावेसारखे पाण्यात सोडले. भक्तांच्या भावना अनावर झाल्या. ''लौकिकमताने मी जात आहे. तरी भक्तांच्या घरी व गाणगापूरला माझे सान्निध्य सदैव राहील.'' असे श्री गुरूंनी सांगितले. नंतर ते पोचल्यावर प्रसादाची खूण म्हणून फुले वाहत आली.
तू भक्तजना कामधेनु l मनुष्यदेही अवतरोनु l
तुझा पार न जाणे कवणू l त्रैमूर्ती तूच होसी ll
श्री गुरूंच्या लीलाकथा श्रीगुरूचरित्रात आलेल्या आहेत. आजही श्री गुरु गाणगापुरातच आहेत. भक्तांना ते दर्शन देतात.](http://sphotos-g.ak.fbcdn.net/hphotos-ak-snc6/s480x480/603236_468491469882432_30831876_n.jpg)





