मंगळवार, २५ जुलै, २०१७

‘नक्षत्र अलंकार’- लेखक: दिपक चंद्रकात पिंपळे

श्री स्वामी समर्थ

ज्योतिष शास्त्रात वेळवेगळ्या विषयावर भरपूर पुस्तक प्रकाशित झाली आहे मग ती पारंपारिक असोत अथवा कृष्णमूर्ती पद्धतील असो. त्यातच एक माझा मानस असा होता की ४-स्टेप थेरी के पी. पद्धतीमधील माझे पुस्तक ‘नक्षत्र अलंकार’ हे कर्मस्थान तसेच नौकरी/व्यवसाय या विषयावर आहे आणि ते प्रकाशित व्हावे अशी खूप ईच्छा २०१२ पासून होती परंतू प्रकाशक मिळाले नाही. असो..!!

परंतू आज या facebook च्या माध्यमातून हा माझा ग्रंथ प्रकशित करीत आहे. या ग्रंथात कार्येश ग्रह हे माणसाच्या आयुष्यावर कसे परिणाम करतात. त्यामुळे केपी ४-स्टेप थेरीचा उपयोग हा केवळ घटना कधी घडेल एवढेच सांगणे मर्यादित नसून जन्म कुंडलीचे विवेचन उत्तम होऊ शकते यासाठीच या माझ्या संधर्भ ग्रंथाची रचना केली आहे. हा ग्रंथ एकून चार भागात असून प्रथम भागामध्ये प्रत्येक क्षेत्रातील प्रसिद्ध व्यक्तीच्या कुंडल्या विवेचन करून ते साखळी पद्धतीने सिद्ध करून दाखविले आहे उदा. सचिन तेडुलकर (क्रिकेट), लता मंगेशकर (कला), बाबा रामदेव (योग/आध्यात्म), विलासराव देशमुख (राजकारण), श्री चंद्रकांत भट्ट तसेच माझे गुरु श्री सुनीलजी गोंधळेकर (ज्योतिषशास्त्र), सलमान खान (फिल्म) ई. तसेच मला अनुभव आलेल्या कुंडल्यांचे शास्त्र शुद्ध पद्धतीने विवेचन केले आहे. अशा साधारण २६ कुंडल्या या ग्रंथात आहे.  ४-स्टेपचे नियम आणि नौकरी व व्यवसायाची नियामली देखिल आहे. जन्मवेळ लंग्नशुद्धी तेसेच हर्शल-नेप्चून, प्लूटो यांचा प्रभाव, गोचर भ्रमण आणि रुलीग प्लानेट या सर्व बाबीचा या ग्रंथात समावेश आहे आणि कशा पद्धतीने उत्तराच्या समीप पोहचता येत हे दर्शविले.

स्वामीनी जे भविष्य कथनाच्या वेळी सुविले तेच मी लिहिले आहे. या नियमाच्या चैकाटीला गुरु महराजांची साथ हवी असते असे मला वाटते.

आपणास हा ग्रंथ e-book माध्यमातून हवा आल्यास कळवावा.
‘नक्षत्र अलंकार’- लेखक: दिपक चंद्रकात पिंपळे /किमंत १५० रु.
संपर्क : ९८२३४४८४४९

Preview

गुरुवार, १ डिसेंबर, २०१६

शासक ग्रहांची किमया (रुलीग प्लानेट)

!! श्री स्वामी समर्थ !!

कृष्णमूर्ती पद्धतीत शासक ग्रहांना (रुलीग प्लानेट) यक्षनीची कांडी (मँजिक) म्हटले आहे.  तत्कालीन प्रश्न देखिल सहजपणे सोडवता येतात. माझ्या घरात चुलत भावाची पत्नी गरोधर आणि साधारण ९ महिने पूर्ण झाले त्यामुळे बाळाचे आगमन कधी होणार हा कुतूहलाचा विषय तर होताच परंतू आम्ही दत्त-स्वामी भक्त या वर्षी माझे दत्त गुरुचरित्र पारायण दत्तजयंती मध्ये होणार की नाही कारण पुढील १० दिवस वृद्धी पडेल आणि १३ डिसेंबर रोजी ‘दत्त जयंती’ आहे आणि दर वर्षीचा आपला हा नियम या वर्षी खंडीत होतो की काय असे वाटत होते. त्यामुळे २९/११/२०१६ मंगळवारी सहज दुपारी माझ्या सौभाग्यवतीने कुंडली मांडण्याचा आग्रह धरला आणि ठोकळा कुंडली मांडत दु. २:४८ रुलिंग प्लानेटची नोंद घेतली.

२९/११/२०१६ दु. २:४८
L:  (मीन) – गुरु
LS:   बुध
S:  (अनुराधा) – शनी (केतू)
R:  (वृश्चिक) – मंगळ
D:  (मंगळवार) – मंगळ

डॉक्टरने पुढील ६ ते ७ दिवस वाट पाहण्यास सांगितले त्यामळे एक आठवडा असल्याने उत्तर लगेच मिळाले होते की प्रसृती ही गुरुवारी होणार परंतु रुलिंग मध्ये बुध आहे आणि शनी देखिल आहे त्यामुळे शनिवार हे देखिल उत्तर असू शकते. पुन्हा चंद्राचे गोचर पाहिले तर गुरुवारी (गुरु) मुळ नक्षत्र (केतू) असून सकाळी साधारण १० ते १२ पर्यंत मकर (शनी) लग्न सुरु होते (हे सर्व ग्रह रुलींगमध्ये आहे) त्यामुळे या दरम्यानच घरी मुलगी येईल असे भविष्य केले. डॉक्टरकडे रुटीन चेक-अप करण्यास बुधवारी गेले असता त्यांनी शनिवार पर्यन्त थांबण्यास सांगितले. परंतू प्रसृती वेदना ह्या गुरुवारीच सकाळी सुरु झाल्या आणि ठीक ११:३० मी. नॉर्मल प्रसृती होऊन मुलगी झाली आणि माझी भविष्यवाणी तंतोतंत खरी ठरली आणि सर्वात महत्वाचे म्हणजे मी आता ७ दिवसाचे नाही परंतू ३ दिवसचे “गुरु चरित्राचे” पारायण करू शकेल. माझा हा वार्षिक नित्यनियम जणू काही दत्त महाराजांनी सांभाळला हे मात्र नक्की.. !!! ज्योतिष शास्त्राचे अनुभव हे नित्य येतात त्यातच स्वामी महाराजाची साथही मिळत असते. वेळे अभावी मात्र त्याचे कुंडली विवेचन किंवा लेख हा ब्लोग वर मांडणे अवघड होते. असो..!!


!! शुभम् भवतु !!

Preview

शुक्रवार, १६ सप्टेंबर, २०१६

-:: सस्नेह निमंत्रण ::-

!! श्री स्वामी समर्थ !!
विराह ज्योतिष मुक्त विद्यापीठ आयोजित व्याखानमाला : माझा व्याख्यान विषय : (४-स्टेप थेरी के. पी. ) अध्यात्मिक ग्रहयोग - दिपक पिंपळे, दि. १८ सेप्टेम्बर २०१६ रविवार - साय. ४ वा.
स्थळ: व्हिट्स हॉटेल - स्टेशन रोड - औ. बाद.


रविवार, ७ ऑगस्ट, २०१६

!! कुंडलीतील ज्योतिष योग (के. पी. पद्धती) !!

!! श्री स्वामी समर्थ !!
एकंदरीत विचार केला तर ज्योतिष शास्त्राचे बरेच संशोधन अगदी अलीकडील काळात के पी. पद्धतीने झाले आहे आणि त्यास नियमाच्या आधार आहे. लोकांना फार प्रश्न पडतात, ज्योतीषांस आपली कुंडली चांगली माहिती असते हो..!!. एखादे जाताकास रत्न सुचविले कि लागलेच आमच्या बोटाकडे लक्ष ठेवतात कि आम्ही रत्न घातले आहे कि नाही.. अशा “जातक कथा” खूप आहे, नित्य अनुभव येतो. असो..
‘जोतिष योग’ कुंडलीत पालक लहानपणी कोणीच विचारीत नाही, फक्त doctor, engineer, software हे योग पाहतात. परंतू ज्योतिष योग हा वारसाने परंपराने कधी कधी default येतो. असेच एक प्रभावी व्यक्तिमत्व असणारे आमच्या क्षेत्रातील श्री पुरोशात्तम कोराणे यांची कुंडलीत “ज्योतिष योग” पाहू, ८ ऑगस्टचा श्रावणी सोमवार १९७७ दिवशीचा यांचा जन्म आणि तोच योग या ८ ऑगस्टला श्रावणी सोमवारी निमीत्ताने आला आहे. सर्वाना कळवा या दृष्टीकोनातून याच्या कुंडलीत ज्योतिष योग पाहूया.
नियम: जर प्रथम भावाचा(व्यक्तिमत्व) उप स्वामी (सब) गुरु, चंद्र, शनी अथवा केतू असून जर तो १, ५, ९, अथवा १२ भावाशी संबधित असेल तर जातक हा ज्योतिष शास्त्राकडे वळतो.
या कुंडलीत प्रथम भावाचा सब हा गुरु (विद्या) असून तो ५ पंचमेश (धर्म त्रिकोण) असून पंचमात (कतू – मंत्र विद्या) आहे गुरु हा अष्टम स्थानी (परंपराने वारसेने) असून गुरुची १२ स्थानावर दृष्टी आहे. प्रथम स्थानी वृश्चिक रास (संशोधक रास/प्रक्टिकल) असून यामध्ये नेपच्यून (गूढ शास्त्राचा द्योतक असून वाचासिद्धी देणारा ग्रह असून) केतू हा मीन रास (अध्यात्मिक अनुभव) त्यामुळे हे ज्योतिष आहेत.
यात तृतीय भावाचा (लिखान) सब हा बुध (लिखाण कारक प्रभावी/बुद्धीला पटणारे) असे असून बुध हा लाभेश (परिपूर्णता) आहे. शनी नवमं स्थान हे भाव सदर जाताकास प्रभावी ठरतात. याच प्रकारे माझ्या कुंडलीत देखील वृश्चिक लग्न असून मिथून रास आहे तर कर्क राशीचा गुरु नवम भावी आहे. या निमित्ताने पुरोशात्तमजीना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा ..!!!
!! शुभम भवतु !! गुरुदेव दत्त..!!


गुरु पालट (गुरूचा कन्या राशीत प्रवेश)

!! श्री स्वामी समर्थ !!
गुरु महाराज ११ ऑगस्ट रोजी कन्या राशीत प्रवेश करणार आहे. “गुरु मला कितवा आहे, कसा आहे” अशी सध्या रोजी विचारनी सुरु असते. ज्योतिष शास्त्रातील काही माहित असो अथवा नसो परंतू पूर्वी पासून कोणाकुडून ऐकत असलेला हा ज्योतिषास चीमटभर भाग सर्वांना माहित असतो अथवा जाणून घेण्याची उत्सुकता हि असते. त्यात मग ४, ८, आणि १२ हे खडतळ, त्रासदायी, कष्टप्रद असा असतो आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे १२ वा गुरु मुलीच्या विवाहास अडचणी देणारा, ‘गुरुबळ’ नाही, अशी माहीती लोकांमध्ये प्रचलित आहे कि ते समजाविणे आता कठीण आहे. माझ्या ब्लोगवर माझ्या एका ज्योतीष मित्राच्या बहिणीस १२वा गुरु सुरु असताना विवाह झाला आहे व त्या पत्रिकेचे विश्लेषण देखील मी केले आहे. असो.. अहो..!! कुठलाही ग्रह ४, ८, १२ गोचर हे वाईट परिणाम देणारे थोड्याप्रमाणे असते त्यात गुरु असा वेगळा अपवाद नाहीच आहे. जन्म कुंडलीत दशास्वामी काय परिणाम देणार आहे ते देखील महत्त्वाचे ठरते. सध्यातरी एवढेच सांगेल कि ४ गुरु सुरु असेल त्यांनी घरात वाद टाळा, ८ गुरु सुरु असेल तर कुणास पैसे उधार देणे, शेअर मार्टेकमध्ये खूप पैसा लावणे टाळावे, १२ गुरु मनासारखे न घडणारे असा असतो, परंतू तो अध्यात्मिक प्रगती निश्चित करतो. गुरु भक्तीची वाढ निर्माण करतो. गुरूचा कन्या राशीतल प्रवेशा समयीच “ श्री नृसिंह स्वामी महाराजांनी” आपले अवतार कार्य संपून श्री शैल्यास निघून गेले. कन्यागत गुरु म्हणजे “गंगा-कृष्णा” भेटपर्व असा उत्सव श्री क्षेत्र वाडीस सुरु होणार आहे असा योग १२ वर्षांनी येतो. मग या ४ ८ आणि १२ गुरूचा आपण कसा परिणाम भोग्याचा याची तयारी तुमची तुम्ही थोड्याफार प्रमाणात करू शकता...!!! बाकी शेष स्वामी महाराजावर सोपवावे... गुरुविण मज कोण दाखवील वाट ...!!!